तुटेल तुटेल म्हणता म्हणता
कसं अचानक जुळून आलं
असा सुटला बाण आणि
चिखलात कमळ फुलून आलं...!
'ओम' फस्स होणार सारं
जाणकारांचा होरा होता,
आपापल्या जागांसाठी
प्रत्येकाचा तोरा होता !
संगीतखुर्ची नको आता
वेळेवरती कळून आलं,
तुटेल तुटेल म्हणता म्हणता
कसं अचानक जुळून आलं...!
- दुर्गेश सोनार ( १९ सप्टेंबर २०१४ )
No comments:
Post a Comment