क्रांतिवीर
अन् सुधारकांचा धगधगता
महाराष्ट्र
थोर
तपस्वी पुरोगाम्यांचा लखलखता
महाराष्ट्र
राकट
आणि कणखरतेचा बलशाली महाराष्ट्र
हळूवार
अन् नजाकतीचा मखमाली महाराष्ट्र
संतांची
ती अभंगवाणी गुणगणतो महाराष्ट्र
शाहिरांच्या
पोवाड्यांतून सळसळतो महाराष्ट्र
हिमालयाला
साद घालतो सह्यगिरी महाराष्ट्र
दरीखोऱ्यातून
मुक्तपणाची मुशाफिरी महाराष्ट्र
लाख
संकटे झेलून तरला अबाधित
महाराष्ट्र
देशरक्षणासाठी
झिजला अनामिक महाराष्ट्र
सुखशांतीचा
झुळझुळणारा मुग्ध झरा महाराष्ट्र
भरतभूमीच्या भाळावरचा सोनहिरा महाराष्ट्र
भरतभूमीच्या भाळावरचा सोनहिरा महाराष्ट्र
- दुर्गेश
सोनार ( ३०
एप्रिल २०१२ )
No comments:
Post a Comment