Friday, September 19, 2014

तुटेल तुटेल म्हणता म्हणता...

तुटेल तुटेल म्हणता म्हणता
कसं अचानक जुळून आलं
असा सुटला बाण आणि
चिखलात कमळ फुलून आलं...!

'ओमफस्स होणार सारं
जाणकारांचा होरा होता,
आपापल्या जागांसाठी
प्रत्येकाचा तोरा होता !

संगीतखुर्ची नको आता
वेळेवरती कळून आलं,
तुटेल तुटेल म्हणता म्हणता
कसं अचानक जुळून आलं...!

दुर्गेश सोनार १९ सप्टेंबर २०१४ )