फेसबुकाच्या
वॉलवर
दुष्काळाचा
छानसा फोटो अपलोड करून
तो
वाट बघत बसला
कमेन्टच्या
पावसाची...!
थोडंसं
पेज रिफ्रेश केलं आणि बघतो
तो काय
लाईक्स
आणि कमेन्टचा
अक्षरशः
धो धो पाऊस...
खरंच,
किती
सोशल होत चाललोय आपण
या
नेटवर्किंगच्या जमान्यात..!
सगळ्याच
समस्यांवर आपण
अशी
मिळवू पाहतो ऑनलाईन उत्तरं
आणि
चॅट करता करता
करून
घेतो आपल्याही संवेदनांचं
ऍब्रिव्हिएशन !
कम्प्युटरच्या
छोट्याशा विन्डोतून
क्रियाप्रतिक्रियांचे
उमटत राहतात
ग्रीन,
ऑरेंज आणि आयडल
आयकॉन्स...
भावना
पोहोचवण्यासाठी उमटतात
इमोकॉन्स...
कुणाकुणाशी
चॅट करत राहतो आपण
आणि
ऑनलाईन
सुखदुःखांच्या गोष्टी करत
करत
होत
जातो ऑफलाईन
आपल्या
भवतालच्या जगापासून...!
- दुर्गेश
सोनार ( २८
मे २०१२ )