Wednesday, July 31, 2013

टिव टिव चालली डोक्यात...!

टिव टिव चालली डोक्यात
बडबड टाकते पेचात
कधी नवीन कधी जुनी
ठरते कमेन्ट वादात...!

टिव टिव चालली डोक्यात
बडबड टाकते पेचात
टिव टिव चालली डोक्यात
बडबड टाकते पेचात
काही जरी बोले कुणी
आगीत भडका तेलाने
सोचू अगर बोलू तो भीं
डिबेट रंगते जोमाने...

चॅनेलांचे बूम बूम नको
बोलून फसले तोऱ्यात..!
टिव टिव चालली डोक्यात
बडबड टाकते पेचात
कधी नवीन कधी जुनी
ठरते कमेन्ट वादात...!


वादात तू चर्चेत तू
गिरे तो भी उपर टांग है तू
अति झाले हसू आले
अकलेचे तारे हे तोडले तू
रोज असे बोल तुझे
शोभाच झाली हो लोकांत
टिव टिव चालली डोक्यात
बडबड टाकते पेचात
टिव टिव चालली डोक्यात
बडबड टाकते पेचात


- दुर्गेश सोनार ( ३१ जुलै २०१३ )