Saturday, March 15, 2014

कमळाबाईच्या घरांत...

'कमळा'बाईच्या घरांत
मानापमान झाले सुरू
कुणाला कुठली सीट
कुठली जागा धरू !

रागावलेली 'मुरली' त्याची
'कृष्ण'च झाला 'लाल'
आपापली जागा धरून
फुगवून बसले गाल !

स्वकियांच्या भांडणात
'स्वराज' कसे येईल बरे ?
असेच चालत राहिले तर
'नरेंद्रा'चे नाही खरे !


  • दुर्गेश सोनार ( १५ मार्च २०१४ )

Thursday, March 13, 2014

टेंगूळ आले मोठे

निवडणुकीचा कलगीतुरा
वादंगाचा चिखल
धनुष्यातून बाण सुटला
गाळात फसले कमळ !

मित्रानेच हा दगड मारला
टेंगूळ आले मोठे
"नरेंद्रा'च्या रथात अडसर
वाटेवरचे काटे !

शत्रूपेक्षा मित्रच वरचढ
रंगत आहे "सामना'
धनुष्याची दोरी आणखी
कशास उगा हो ताणा !


  • दुर्गेश सोनार

Wednesday, March 12, 2014

आम आदमीचा रोड शो

विमानातून उतरले
रिक्षामध्ये बसले
तिथून गाठली लोकल थेट
अंधेरीपासून चर्चगेट

आला नेता, आला नेता
त्याला द्या रे विंडो सीट
'आप'लीच आहे लोकलगाडी
बसा खुश्शाल विनातिकिट

'आम आदमी'चा असला
रोड शो भारी
चाकरमानी वेठीला
पायाखाळी जळतंय काही
कळतंय का रे टोपीला ?


  • दुर्गेश सोनार ( १२ मार्च २०१४ )   

Wednesday, March 5, 2014

निवडणुकीचे बिगुल

निवडणुकीचे देशभरात
वाजले आता बिगुल
कोण ठरेल मॅचविनर
कुणाची दांडी गुल !

मतदारराजा आता तुझा
वाढला बरं भाव
पुढाऱ्यांच्या तोंडी आता
फक्त तुझंच नाव !

सारासार विचार कर
निर्धार कर पक्का
सुशासन जो देईल
त्याच्यावरतीच शिक्का !

  • दुर्गेश सोनार ( ५ मार्च २०१४ )




Tuesday, March 4, 2014

'राज' दरबारी दक्ष गडकरी

'राज' दरबारी दक्ष गडकरी
सैनिक झाले त्रस्त
धनुष्याच्या दोरीमध्ये
अडकून पडला दोस्त !

पांडवांत सहावा कर्ण कशाला ?
चर्चा झाल्या सुरू
मातोश्रीच्या मनात खदखद
'मार्ग' कोणता धरू ?


  • दुर्गेश सोनार ( ४ मार्च २०१४ )