खाणाऱ्यांची भूक अशी की
जे जे दिसले खातच गेले...
खादाडांची पंगत बसली
मिळेल ते ते गट्टम केले...
कुणी लाटली जमीन कुणाची
कुणी लाटला चारा
दूर दूर संचार करुनी
कुणी लाटल्या तारा
कलकल नुसती माडीवरती
खेळात अडकले भाई
राष्ट्रकुलातून पदक कमाई
काही उरली नाही..!
ताकावरचे लोणी घुसळून
राजा खाई तुपाशी
साधीभोळी प्रजा बिचारी
राही तशीच उपाशी !
- दुर्गेश सोनार ( २ ऑगस्ट २०११ )
या सर्वावर कडी करोनी
ReplyDeleteजगणे होई भारी !
दुनियेची ही रित निराळी
आम्हा पर्वा नाही..।। :P
नेहेमी प्रमाणेच उत्तम!!