नळाला
पाण्याची धार बघून
काय
आनंद झालाय मायमाऊल्यांना...
पहिल्या
पावसात भिजताना
जो
होतो ना आनंद तोच आनंद
आता
त्यांच्याही डोळ्यांत...
माळ्यावरून
काढावी जुनी छत्री
तशा
त्यांनी काढल्यात कळशा,
हंडे आणि
घागरी...!
इतके
दिवस टिपूसही नव्हता नळाला...
आणि
डोळ्यांची धार थांबत नव्हती...
नळासमोरची
रांग मोठी
काही
केल्या हटत नव्हती..
"आता
आलंय पाणी तर थो़डं थोडं भरून
घेऊ
साचलेली
धुणीभांडी भराभर उरकून घेऊ...”
पदर
खोचून बायाबापुड्या स्वतःशीच
पुटपुटतात
पाण्यासाठी
रातंदिन कुठे कुठे वणवणतात
बाया
असं राहतात राबत
पोरसोरं
खेळत राहतात
हातात
घेऊन कागदी नावा
खड्ड्यामध्ये
सोडत राहतात..
नळात
नाही, ढगात
नाही
कुठेच
कसं पाणी नाही
पावशाही
व्याकूळला
त्याच्या
ओठी गाणी नाही...
कोरड्यास
खाऊ कसं
कधी
देशील दिलासा ?
खोटा
झाला पैसा आता
ये
रे ये रे पावसा...!
- दुर्गेश
सोनार ( ७
मे २०१२ )
No comments:
Post a Comment